नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मोटारसायकल देण्यास नकार दिल्याने टोळक्याने दुचाकीस्वाराच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश आहिरे (२३),बाबू यादव (२०) व साहिल गांगुर्डे (२१ रा.सर्व कडेपठार चौक,श्रमिकनगर) अशी संशयितांची नावे आहेत. याबाब, समाधान तुळशीराम तालखे (रा.कडेपठार चौक,श्रमिकनगर) या युवकाने फिर्याद दिली आहे.
तालखे शनिवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास परिसरातील गंगासागर नगर भागातून दुचाकीवर आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. परिचीत असलेल्या संशयितांनी तालखे यांची वाट आडवित थोड्यावेळासाठी दुचाकीची मागणी केल्याने ही घटना घडली.
तालखे यांनी मोटारसायकल देण्यास नकार दिल्याने संतप्त त्रिकुटाने शिवीगाळ करीत त्यास लाखाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या हाणामारीत एकाने डोक्यावर बिअरची बाटली फोडल्याने तालखे जखमी झाले. अधिक तपास हवालदार घारे करीत आहेत.