नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील अश्विननगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ३० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वास मोहन मोतीराळे (रा. अश्विननगर, सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मोतीराळे कुटुंबिय ५ ते १३ फेब्रुवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूमधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
गावठी कट्टा बाळगणा-या तरूणावर कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गावठी कट्टा बाळगणाºया तरूणास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई वज्रेश्वरी झोपडपट्टी परिसरातील पाट किणारी करण्यात आली असून या कारवाईत पिस्तूल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश उर्फ बाबा गणेश परसे (२२ रा.कुमावतनगर) असे संशयित पिस्तूलधारीचे नाव आहे. पाट किनारी रोडवर असलेल्या तरूणाकडे पिस्तूल असल्याची माहिती पंचवटी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी पोलीसांनी धाव घेत ही कारवाई केली. संशयिताच्या अंगझडतीत पिस्तूल मिळून आला याबाबत अंमलदार कुणाल पचलोरे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.








