नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पत्नीचा अश्लील व्हिडिओ तिच्या भाऊ भावजयीस पाठवून पतीने सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. माथेफिरू पतीविरोधात पत्नीने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित पतीने गेल्या सोमवारी (दि.१०) पडित महिलेच्या भावाच्या पत्नीस आपल्या पत्नीचा अश्लिल व्हिडीओ पाठविला होता. याबाबत वहिणीने भावास सांगितल्याने ही घटना घडली. भावाने आपल्या मेव्हण्यास जाब विचारल्याने संतप्त संशयिताने सदरचा व्हिडीओ आपल्या शालकास पाठवून सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्यामुळे पत्नीने पोलीसात धाव घेतली असून माथेफिरू पतीविरोधात रितसर तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.