नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळया भागातील घटनांमघ्ये चौघींचा विनयभंग करण्यात आला तर एका अल्पवयीन मुलीवर तिच्या मित्राने बलात्कार केला. याप्रकरणी पोलीस दप्तरी विनयभंग,बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शरदचंद्र मार्केट यार्डात पहिली घटना घडली. परप्रांतीय विवाहीता गेल्या डिसेंबर महिन्यात मार्केट यार्डात उभी असतांना लालाराम सुजाजी चौधरी (मुळ रा.राजस्थान) या परिचीताने तिचा विनयभंग केला. प्रेमाची मागणीस महिलेने नकार दिल्याने संशयिताने हे कृत्य केले. त्यानंतर संशयिताने पती पत्नीच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच समाजात आपले व दिपकशेठ चौधरी याचे सदर महिलेशी संबध असल्याची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.
दुसरी घटना काठेगल्ली भागात घडली. बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी गुरूवारी (दि.१३) रस्त्याने पायी जात असतांना पियुश पाथरे (रा.काठेगल्ली) या युवकाने तिची वाट अडविली. यावेळी संशयिताने मुलीस धमकावून आपल्या दुचाकीवर कॉलेज रोड भागातील गार्डन मध्ये नेले. या ठिकाणी तिचा विनयभंग करण्यात आला. मुलीने घरी येवून कुटुंबियांकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक तोंडे करीत आहेत. तिसरी घटना चेतनानगर भागात घडली. राज टॉवर या इमारतीसमोरून पायी जाणाºया तरूणीने याबाबत फिर्याद दिली आहे. युवती रस्त्याने पायी जात असतांना अल्टो एमएच १५ बीएन ६४९६ या कारमधून आलेल्या विशाल शिरसाठ (रा.चेतनानगर) व रोहित दिलीप जगताप (३४ रा.नरहरीनगर,पाथर्डी फाटा) या संशयितांनी तिचा विनयभंग केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाणयत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत.
चौथी घटना सिडकोत घडली. १६ वर्षीय मुलीवर तिच्या अल्पवयीन मित्राने वेळोवेळी बळजबरीने बलात्कार केला. मुलीच्या घरी कुणी नसल्याची संधी साधत त्याने हे कृत्य केले. महिनाभरात अनेकवेळा हा प्रकार घडल्याने मुलीने आपल्या कुटूंबियाकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक फुलपगारे करीत आहेत.
तर पाचवा प्रकार शिदे गावात घडला. प्रसाद घुगे नामक इसमाने गुरूवारी (दि.१३) विवाहीत पीडितेचे घर गाठून तिचा विनयभंग केला. प्रेमाची मागणी करीत त्याने हे कृत्य केले. महिलने याबाबत आपल्या पतीकडे आपबिती कथन केल्याने पतीने जाब विचारला असता संशयिताने धक्काबुक्की करीत त्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार अनिल पवार करीत आहेत.