नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सेट्रींग कामाला लागणा-या लाकडी बल्यांचा ढिगारा अंगावर पडल्याने २३ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना माडसांगवी ता.जि.नाशिक येथे घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जाकिर अजी अब्दूल नजीब मन्सुरी (रा.मारूती मंदिराजवळ,सप्तशृंगी नगर) असे मृत कामगाराचे नाव आहे. मन्सुरी बुधवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास माडसांगवी येथील बसस्टॅण्ड जवळील मोकळ््या जागेत सेट्रींग मटेरियल ठेवत असतांना ही घटना घडली. लाकडी बल्लीच्या ढिगा-यावर उभे राहून तो काम करीत असतांना अचानक चक्कर आल्याने ही घटना घडली.
एका बल्लीत पाय अडकून तो जमिनीवर पडला असता बल्लीचा ढिगारा त्याच्या अंगावर कोसळला. या घटनेत छाती पोटार गंभीर दुखापत झाल्याने त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रानी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.