नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कलर काम करीत असतांना दुस-या मजल्यावरून पडल्याने पेंटरचा मृत्यू झाला. ही घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या मााहितीनुसार विवेककुमार (२६ मुळ रा.बिहार हल्ली श्रमिकनगर,सातपूर) असे मृत पेंटरचे नाव आहे. विवेक कुमार मंगळवारी (दि.११) धर्माजी कॉलनीतील मधुलक्ष्मी हाईटस या इमारतीच्या दुसºया मजल्यावर कलर देत असतांना ही घटना घडली. अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यास दिलीप आहिरे व गुलाब आहिरे यांनी तात्काळ जिल्हारूग्णालायात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार हिंडे करीत आहेत.