रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये भररस्त्यात महाविद्यालयातील तरुणीला शिवीगाळ करुन मारहाण…गुन्हा दाखल

by India Darpan
फेब्रुवारी 12, 2025 | 3:25 pm
in क्राईम डायरी
0
rape


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रेमप्रकरणातून युवतीवर चाकू हल्ला झाल्याची घटना ताजी असतांना, मंगळवारी (दि.११) पाठलाग करीत आलेल्या तरूणाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केला. भररस्त्यात शिवीगाळ करीत संशयिताने मारहाण केली असून, यावेळी युवतीच्या मैत्रीणी मदतीस धावून आल्या असता त्यांना लोटून देत संशयिताने धुम ठोकली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत तुपसुंदर (रा.सातपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित तरूणी मंगळवारी (दि. ११) नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आली होती. व्ही.एन.नाईक महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळून ती आपल्या मैत्रीणींसमवेत रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. कॉलेज सुटल्याने घराकडे जाणा-या युवतीची वाट अडवित त्याने विनयभंग केला. यावेळी त्याने तुला माझ्या सोबत बोलावे लागेल असे म्हणत तिच्याशी हुज्जत घातली. तरूणीने त्याच्याकडे दुर्लक्ष करीत पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने आरडाओरड करत तरुणीला शिवीगाळ केली. यावेळी गर्दी जमल्याने त्यास अधिक चेव आला.

दमबाजी करीत असतांना पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याने थेट मारहाण केली. यावेळी तरूणीच्या मैत्रीणींनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली असता संशयितानी त्यांना लोटून देत धुम ठोकली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. भयभित झालेल्या तरूणींनीनी पोलिस ठाणे गाठून आपबिती कथन केल्याने पोलिस दप्तरी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार अनिल जाधव करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भुतबाधा झाल्याचे सांगुन महिलेला २ लाख ५१ हजार रुपयाला फसवले…भोंदूबाबाला ग्राहक न्यायालयाने केला आर्थिक दंड: अंनिसने केले स्वागत

Next Post

सिटीलिंकच्या या मार्गावर बससेवा सुरु…बघा बसेसचे वेळापत्रक

India Darpan

Next Post
Nashik city bus 3 e1700490291563

सिटीलिंकच्या या मार्गावर बससेवा सुरु…बघा बसेसचे वेळापत्रक

ताज्या बातम्या

IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011