नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चाकूचा धाक दाखवत एकाने पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. बापलेकीच्या पवित्र नात्यास काळीमा फासणा-या या घटनेने संताप व्यक्त होत असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडितेची आई रविवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास आपल्या लहान मुलींना घेवून किराणा दुकानात सामान घेण्यासाठी गेली असता ही घटना घडली. घरात कुणी नसल्याची संधी साधत नराधन पित्याने आपल्या मोठ्या अल्पवयीन मुलीस वरच्या मजल्यावरील रूममध्ये घेवून जात हे कृत्य केले.
चाकूचा धाक दाखवत संशयिताने मुलीवर बलात्कार केला. यावेळी त्याने मुलीस वाच्यता केल्यास आईसह सर्वांना चाकूने मारून टाकेल अशी धमकी दिली. मात्र घरात पोहचलेल्या आईच्या ही बाब निदर्शनास आल्याने तिने पीडितेस घेवून पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.