नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोडवरील रामचंद्र नगर भागात पुजापाठ करून घराकडे परतणा-या महिलेच्या गळयातील सुमारे अडीच लाख रूपये किमतीची सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मायावती दत्तात्रेय शिंदे (२६ रा.नायरा पेट्रोल पंपामागे,रामचंद्रनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिंदे या शुक्रवारी (दि.६) हरतालीके निमित्त म्हसरूळ येथील साई बाबा मंदिरात गेल्या होत्या. पुजाअर्चा करून त्या घराकडे पायी परतत असतांना ही घटना घडली.
आपल्या राहत्या घराजवळ त्या आल्या असता वैदूवाडीकडून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या अंगावर गाडी घालत गळ््यातील सुमारे अडिच लाख रूपये किमतीच्या सोन्याची मोठी व शॉर्ट पोत हिसकावून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.