.नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोरेवाडीतील हिवाळे वाडी भागात राहणा-या २६ वर्षीय युवकाने सोमवारी (दि.१०) गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संकेत संतोष साळवे (रा.बर्डे निवास मोहन किराणा स्टोअर्स जवळ) असे मृत युवकाचे नाव आहे. साळवे याने सोमवारी अज्ञात कारणातून आएसपी शाळा भागातील झाडास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच सतिश साळवे यांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता डॉ.तेजस्विनी आंबोरे यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार ठेपणे करीत आहेत.
तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावर ठेवणा-या तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. शरणपूर भागात ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक बंडू पुंजारे (२२ रा.सुपर मार्केट जवळ,तिरंगाचौक कामगारनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. पुंजारे याच्या वाढत्या गुन्हेगारीस रोखण्यासाठी शहर पोलीसांनी त्याच्याविरोधात हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून त्यास तडिपार करण्यात आलेले असतांना त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांना सोमवारी (दि.१०) तो शरणपूर येथील सार्वजनिक शौचालय भागात मिळून आला. याबाबत अंमलदार अजय ससाणे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.