नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भाजीपाला खरेदी करून घराकडे परतणा-या महिलेच्या गळयातील सोनसाखळीसह व पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना कपालेश्वरनगर भागात घडली. या घटनेत ६३ हजार रूपये किमतीच्या अलंकारावर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया विजय रामटेके (रा.चंद्रपूर हल्ली कपालेश्वरनगर) यांनी फिर्याद दिली आहे. मुळच्या चंद्रपूर येथील रामटेके या आपल्या मुलाकडे आल्या आहेत. सोमवारी (दि.१०) सायंकाळी त्या परिसरातील भाजीबाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. खरेदी करून त्या मुलाच्या घराकडे पायी जात असतांना साई इश्वर बिल्डींग समोर ही घटना घडली. दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील सोनसाखळी व पोत असा सुमारे ६३ हजाराचा ऐवज हिसकावून नेला. अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.
वृध्द महिलेच्या गळयातील सोन्याची पोत व डोरले चोरट्यांनी केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत भामट्यांनी वृध्द महिलेच्या गळयातील सोन्याची पोत व डोरले हातोहात लांबविल्याचा प्रकार मेळा बसस्थानक आवारात घडला. या घटनेत सुमारे ९० हजार रूपये किमतीच्या अलंकारावर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकला एकनाथ रसाळ (७४ रा.सातपूर कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. रसाळ या सोमवारी (दि.१०) दुपारी बाहेरगावी जाण्यासाठी मेळा बसस्थानकात गेल्या होत्या. बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ््यातील सोन्याची पोत व डोरले असा सुमारे ९० हजाराचे अलंकार हातोहात लांबविले. अधिक तपास हवालदार लोंढे करीत आहेत.