नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून रविवारी (दि.९) वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. त्यात विवाहीतेसह सिडकोतील एकाचा समावेश आहे. दोघाच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी व अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार रामवाडीत राहणा-या पुनम प्रदिप गजरे (२० रा.वंदन व्हिला अपा.आदर्शनगर) या विवाहीतेने रविवारी दुपारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पती प्रदिप गजरे यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार अहिरे करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोतील सिंहस्थनगर भागात घडली. रविंद्र काशिनाथ गुळवे (२१ रा.वैशाली बुध्दविहार चौक) या युवकाने रविवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या लोखंडी हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यास बेशुध्द अवस्थेत तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार आवारे करीत आहेत.