नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून स्विफ्ट कारसह वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत अंबड,गगापूर व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिडकोतील मुकूंद निंबा मांडगे (रा.वक्रतुंड हाईटस जवळ पवननगर पाण्याच्या टाकी समोर) यांची स्विफट कार एमएच १५ एफटी ३०९५ शुक्रवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास त्यांच्या घरपरिसरात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.
मोटारसायकल चोरीची पहिली घटना महात्मानगर येथे घडली. तौसिफ हारून शेख (रा.हिरवेनगर,गायकवाड सभागृहामागे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख गेल्या २९ जानेवारी रोजी महात्मानगर भागात गेले होते. प्रोथियस इंजिनिअरींग सर्व्हीस येथील पार्किंगमध्ये लावलेली त्यांची मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
दुसरी घटना गंगापूररोडवरील विद्याविकास सर्कल भागात घडली. अक्षीता विजय सावंत (रा.इंद्रप्रस्थ अपा.लोटस हॉस्पिटल समोर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सावंत यांची अॅक्सेस मोपेड गेल्या १२ जानेवारी रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणयत आला असून अधिक तपास हवालदार खोडे करीत आहेत.