नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरू असून वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. त्यात महागड्या बुलेटचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड,उपनगर व भद्रकाली पोलीस ठाण्यात गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत.
मोटारसायकल चोरीचा पहिला प्रकार जुने नाशिक येथे घडला. सादिक सुलेमान शेख (रा. खडकाळी, नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख यांची अॅक्सेस मोपेड ( एमएच १५ एचएफ ०३०५) गेल्या २५ जानेवारी रोजी परिसरातील समाज मंदिर भागात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार ढमाले करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोत घडली. कमलाकर रगनाथ कवसकर (रा. उत्तमनगर, सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कवसकर यांची मोटारसायकल एमएच १५ ए ई ३७५२ मंगळवारी (दि.४) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.
तर मोतीराम श्रावण पाटील (रा. सुंदरबन अपा. टाकळी रोड, उपनगर) यांची बुलेट (एमएच १५ एचएल ३००३) गेल्या रविवारी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यानी चोरून नेली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार सांगळे करीत आहेत.