नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वडिलोपार्जीत मिळकत आवारातील झाडांची बेकायदा कत्तल केल्याचा जाब विचारल्याने संतप्त भाऊ भावजयीने वृध्दास शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार शरणपूररोडवरील कुलकर्णी कॉलनीत घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात झाडांची कत्तल करणा-या बिल्डरसह भाऊ आणि भावजयी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेश पाटील, वसंत पालेकर व शकुंतला पालेकर (रा.दोघे कुलकर्णी कॉलनी,शरणपूररोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत चंद्रशेखर शिवराम पालेकर (७५ रा. शिवशांती बंगला,कुलकर्णी कॉलनी) या सेवानिवृत्त वृध्दाने फिर्याद दिली आहे. पालेकर बंधूची कुलकर्णी कॉलनीत वडिलोपार्जीत बंगला आहे.
या मिळकती बाबत दिवाणी न्यायालयाने आदेश पारीत केला असतांना संशयित पालेकर दांम्पत्याने सर्व्हे नं. ६४९ अ पैकी हिस्सा क्र.१ १९ यासी प्लॉट नं.१३ अ याचे क्षेत्र ५५८.४२ चौमी च्या जागेत बांधलेला शिवशांती बंगला ही एकत्रीत वडिलोपार्जीत मिळकत विकसीत करण्याच्या उद्देशाने भानुज डेव्हलपर्सचे बिल्डर संशयित शैलेश पाटील यांच्याशी संगनमत केले.
पाटील यांनी अनधिकृतपणे बंगला आवारातील आंबा, कडूलिंब, शेवगा, पेरू, अशोका व अन्य झाडे तोडली. याबाबत चंद्रशेखर पालेकर यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयित दांम्पत्याने शिवीगाळ करीत दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.