इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकमध्ये अवैधरित्या घुसखोरी करून राहणा-या आठ बांगलादेशी नागरीकांना एका बांधकाम साईटवरुन अटक करण्यात आली. मध्यवर्ती गुन्हेशाखेने ही कामगिरी केली. बांधकाम साईटवर हे बांगलादेशी नागरीक काम करीत असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर तांत्रीक विश्लेषण करून आठ संशयीत नागरीकांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये सुमन कालाम गाझी (वय २७ ) अब्दुला अलीम मंडल (वय ३०) शाहीन मफिजुल मंडल (वय २३) लासेल नुरअली शंतर (वय २३) आसाद अर्शदअली मुल्ला (वय ३०) आलीम सुआनखान मंडल (वय ३२) अलअमीन आमीनुर शेख (वय २२ ) मोसीन मौफीजुल मुल्ला (वय २२) यांचा समावेश आहे. या सर्वांकडे भारतीय नागरिक असल्याबाबत पुरावा मागीतला असता ते उपलब्ध करू शकले नाही. तसेच दोन इसमांकडे आधारकार्ड मिळाले. ताब्यात घेतलेल्या इसमांकडे अधिक चौकशी करता बांगलादेश मधील एकाने बॉर्डर पार करण्यासाठी मदत केली. यातील सुमन गाझी हा सर्वप्रथम भारतात आला. त्यानंतर त्याच्या संपर्कातून उर्वरीत आरोपी भारतात आले. ताब्यात घेतलेल्या इसमांकडे सखोल चौकशी करणेकरीता गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सचिन खैरनार, वपोनि. आडगाव पो.स्टे. हे करीत आहेत.
सदरची कामगिरी संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), नाशिक शहर, मा. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक डॉ. अंचल मुदगल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सपोनि. विश्वास चव्हाणके, सपोनि. प्रविण माळी, सपोउनि. शेरखान पठाण, सपोउनि. किशोर देसले, सपोउनि. बाळु बागुल, यासह पोलिस पथकाने केली.