रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ…वेगवेगळ्या भागात तीन घरफोडया, सव्वा सात लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

by India Darpan
फेब्रुवारी 6, 2025 | 4:57 pm
in क्राईम डायरी
0
crime 88

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वेगवेगळ्या भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा सात लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव उपनगर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घरफोडीची घटना नविन आडगावनाका भागात घडली. विकास यशवंत धात्रक (रा.समरि अपा.जुने स्वामी नारायण मंदिर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. धात्रक कुटुंबिय सोमवारी (दि.३) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली २० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ४६ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार अहिरे करीत आहेत.

दुसरी घटना उंटवाडी भागात घडली. राजेश गंगाधर पाटील (रा.परिमल बंगला,तिडकेनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील कुटूंबिय गेल्या २३ जानेवारी रोजी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बेडरूच्या खिडकीचे गज वाकवून ही चोरी केली. बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील अलमारीत ठेवलेली २० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे दोन लाखाचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधकि तपास हवालदार महाजन करीत आहेत.

तिसरी घटना तपोवन लिंकरोड भागात घडली. याबाबत नरेश राधाकृष्ण धनजल (रा.श्रीहरी रेसि.उत्तरानगर) यांनी फिर्याद दिली आहे. धनजल कुटुंबिय मंगळवारी (दि.४) अल्पावधीसाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली १ लाख २५ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ९० हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका…मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

Next Post

नाशिकमध्ये अवैधरित्या घुसखोरी करून राहणा-या आठ बांगलादेशी नागरीकांना अटक…

India Darpan

Next Post
jail

नाशिकमध्ये अवैधरित्या घुसखोरी करून राहणा-या आठ बांगलादेशी नागरीकांना अटक…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011