नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून एकाने पळवून नेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. महामार्गावर सोडून देत संशयिताने पोबारा केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुलेमान शेख (रा.नानावली,जुने नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. पीडिता मेनरोड भागातील एका मॉलमध्ये कामास आहे. सोमवारी (दि.३) ती नेहमी प्रमाणे कामावर गेली असता संशयिताने तिला वाटेत गाठले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने कुठे तरी पळवून नेले.
या ठिकाणी मुलीवर बळजबरीने बलात्कार करण्यात आला. दुस-या दिवशी दुपारच्या सुमारास संशयिताने महामार्गावरील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागात सोडून दिले. रात्रीभर बेपत्ता असलेल्या मुलीच्या चौकशीत तिने आपबिती कथन केल्याने पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक दहिफळे करीत आहेत.