नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पंचवटीतील नागचौक व गजानन चौकात रविवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागचौक भागात एका टोळक्याने प्रतिस्पर्धी टोळीवर गोळीबार केल्याचा तर दुस-या टोळीने गोळीबार करणा-या संशयितांपैकी एकावर कोयत्याने वार करून जखमी केल्याचा तक्रारीत दावा करण्यात आला आहे.
योगेश जगन मोरकर (वय ३१, रा. नागचौक) याच्या फियार्दीनुसार, संशयित ऋषिकेश उउर्फ सोंडग्या गरड,रूपेश उर्फ वाळ््या गरड,नितीन जाधव,हरदिपसिंग अलक व हर्षल आदींनी रविवारी रात्री साडे दहा वाडेच्या सुमारास नागमंदिराच्या मागे गल्लीत क्रिकेट खेळत असतांना बॅट हिसकावून घेत हल्ला केला. या घटनेत जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने सोंडग्या गरड या संशयिताने गोळीबार केल्याचे म्हटले आहे.
तर हरदीपसिंग औलक (२७, रा. नागचौक) यांनीही फिर्याद दिली आहे. साहिल उर्फ इटली महेश भाटे, योगेश जगन मोरकर,सोहम जोशी,राहूल कानडे व अन्य चार मुलांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औलक रविवारी रात्री साडे दहा अकरा च्या सुमारास आपल्या घराकडे जात असतांना नागचौक संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत साईल उर्फ इटली याने धारदार शस्त्राने डोक्यात वार केला तर जोशी व कानडे याने दगड फेकून मारल्याने जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव व गायकवाड करीत आहेत.