नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर येथील कामगार नगर सदगुरू नगर परीसरात रात्रीच्या सुमारास आठ ते दहा गुंडांनी बिल्डींगमध्ये घुसून तलवार व कोयत्याने हल्ला केला. यात बिल्डींगमधील आनेक घराचे दरवाजे खिडक्याचे काचा फोडत पार्किंग मधील गाड्यानाही लक्ष केल्याची घटना घडली.
दरम्यान काल रात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या कामगार नगरीत व सदगुरू नगरमध्ये काटे हाऊस या बिल्डीग मध्ये ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास आठ दहा गावगुडांचा ताफा येत बिल्डींगमध्ये घुसून तलवार व कोयत्याने हल्ला केला. यावेळी घरात फक्त महीलांच आसल्याने एकच खळबळ उडाली.
यावेळी या गुडांनी आरडाओरडा करत खाली उभ्या आसलेल्या वाहनाही लक्ष केले. या बाबत खाली उभे असलेल्या नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही कोयता उगारला. आज सकाळी या बाबत आमदार सिमा हीरे यांनी परीसरात पाहणी करत संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी आयुक्ताकडे केली आहे.