नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– फोन उचलला नाही या कारणातून एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना मखमलाबाद रोडवरील वडजाईमाता नगर भागात घडली. या घटनेत महिलेने स्व:तास घरात कोंडून घेतले असता संशयिताने दरवाजा वाजवित शिवीगाळ व दमदाटी केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुशाल माळी असे संशयिताचे नाव आहे. पीडिता वडजाईमातानगर भागात राहते. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार ३० जानेवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. महिला घर परिसरात असतांना संशयिताने तिला गाठले. तू माझा फोन का उचलत नाही व माझ्याशी का बोलत नाही असा जाब विचारत संशयिताने तिचा भररस्त्यात विनयभंग केला.
यानंतर महिलेने भितीपोटी स्व:तास आपल्या घरात कोंडून घेतले असता, संशयिताने घराचा दरवाजा वाजवून तिला शिवीगाळ व दमदाटी केली. अधिक तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत.