नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पत्नीस फेसबुकवर संदेश पाठवितो याबाबत जाब विचारल्याने एकाने पतीवर चाकू हल्ला केल्याचा प्रकार म्हसरूळ टेक भागात घडला. या घटनेत पती जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चाकू हल्ला करणा-या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवा अशोक जंगम (रा.शिवनेरी अपा.म्हसरूळ टेक जुने नाशिक) असे चाकू हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत दिपक इखनकर (रा.शांतीनगर मखमलाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.
इखनकर यांच्या पत्नीच्या फेसबुक साईटवर संशयिताने वेळवेळी संदेश पाठविले होते. त्यामुळे इखनकर यांनी शनिवारी (दि.१) रात्री संशयिताचे म्हसरूळ टेक येथील घर गाठून जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संतप्त संशयिताने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. या घटनेत इखनकर यांच्या कपाळावर,डोक्यावर व हातास गंभीर दुखापत झाली असून अधिक तपास हवालदार महाले करीत आहेत.