नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बुरूडवाडीत उघड्यावर जुगार खेळणा-या तिघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. या कारवाईत रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुन बबन भालेराव (रा.गांधीनगर,दिंडोरी),प्रकाश राजू जाधव (रा.हमालवाडी पेठरोड ) व विनोद शिवाजी डामरे (रा.राजपाल कॉलनी,हेमकुंजरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत. बुरूडवाडी परिसरातील पाण्याच्या टाकीखाली काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.३१) पंचवटी पोलीसांनी धाव घेत संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
संशयित पत्यांच्या कॅटवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळतांना मिळून आले. जुगारींच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून याबाबत अंमलदार अंकुश काळे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार मालसाने करीत आहेत.
महिलेची सोन्याची पोत चोरट्यानी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बस प्रवासात महिलेची सोन्याची पोत चोरट्यानी हातोहात लांबविली. ही घटना साक्री ते नाशिक प्रवासात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलेश शशिकांत देशमुख (रा.वृंदावननगर,आडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. देशमुख गेल्या गुरूवारी (दि.३०) साक्री येथून आपल्या आईला सोबत घेवून नाशिकला आले. नंदूरबार नाशिक (एमएच १४ बीटी ४५१०) या बसमधून मायलेकांनी प्रवास केला. बसमधून प्रवास करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी देशमुख यांच्या आईच्या गळ््यातील ८० हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
…….