सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आत्महत्येचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात राहणा-या चौघांनी जीवन संपवले

by India Darpan
जानेवारी 30, 2025 | 11:32 pm
in आत्महत्या
0
sucide


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून बुधवारी (दि.२९) वेगवेगळया भागात राहणा-या चौघांनी आत्महत्या केली. त्यात दोन महिलांसह अनोळखी पुरूष आणि एका तरूणाचा समावेश आहे. या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी उपनगर सातपूर,पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक पुणे मार्गावरून धावणा-या एमएच १४ एलएल १८३८ या आयशर मालट्रक समोर एका ५५ वर्षीय अनोळखी इसमाने झोकून देत आत्महत्या केली. मंगळवारी रात्री ही घटना घडली. ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीस पोलीसांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलीसात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार पी.एस.बोडके करीत आहेत.

दुसरी घटना सातपूर अंबड लिंक रोड भागात घली. रेखा यशवंत माळी (५७ रा. बालाजी व्हिलेज रो हाऊस) या महिलेने मंगळवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला बेशुध्द अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.

तिसरी घटना पेठरोडवरील समर्थनगर भागात घडली. ज्योती श्याम जाधव (४२ रा.साईस्नेह अपा.अष्टविनायकनगर शरदचंद्र पवार मार्केट मागे) या विवाहीतेने बुधवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केली. बेशुध्द अवस्थेत त्या पाण्याच्या टाकीत तरंगतांना आढळून आल्याने त्यांना दीर सचिन जाधव व पती श्याम जाधव यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रानी तपासून मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार संतोष कोरडे करीत आहेत.

चौथ्या घटनेत अरमान आहेसन इलाही कुरेशी (२२ रा.फुले मार्केट घास बाजार,कोकणीपुरा) या युवकाने बुधवारी आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून दुकानाच्या स्टोअरेजमध्ये लोखंडी अ‍ॅगलला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्री पावन गणपती मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला…४० हजार रूपयांची रोकड केली लंपास

Next Post

झिरो प्रिस्क्रिप्शन निर्णयाची अमंलबजावणी होणार…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या सूचना

India Darpan

Next Post
mumbai dpdc

झिरो प्रिस्क्रिप्शन निर्णयाची अमंलबजावणी होणार…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या सूचना

ताज्या बातम्या

om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
nashik3 1024x768 1

शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011