नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पाईपलाईन रोडवरील श्री पावन गणपती मंदिरात घडली असून या घटनेत भामट्यानी दानपेटीतील सुमारे ४० हजार रूपयांची रोकड पळविली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकुमार आनंदराव पाटील (रा.गणेशनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पाईपलाईन रोड भागात श्री पावन गणपती मंदिर आहे. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि.२८) रात्री मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ही चोरी केली. गाभा-यात आणि सभामंडपात ठेवलेल्या स्टीलच्या दानपेट्या उघडून चोरट्यांनी सुमारे ४० हजाराची रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.