नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– लहान मुलांच्या वादातून एका कुटुंबियाने शेजा-यास बेदम मारहाण केल्याची घटना मोरेमळा भागात घडली. या घटनेत दगड फेकून मारल्याने सदर व्यक्ती जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतिष बाळू कोते (रा.काकडबाग,मोरेमळा) यांनी फिर्याद दिली आहे. कोते यांचा लहाण मुलगा प्रथमेश व शेजारी राहणारे ज्ञानेश्वर (पूर्णनाव नाही) यांच्या लहान भाच्याशी मंगळवारी (दि.२८) रात्री खेळत असतांना किरकोळ कारणातून वाद झाला होता.
यावेळी ज्ञानेश्वर,त्याचा भाऊ आणि दोन बहिणींनी एकत्रीत येत कोते कुटुंबियास शिवीगाळ केली. यावेळी कोते यानी समजून सागंण्याचा प्रयत्न केला असता संशयित भावा बहिणींनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रसंगी कोते यांनी बचावासाठी पोबारा करण्याचा प्रयत्न केला असता सशयितांनी दगड फेकून मारल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.