नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव ओमनी कार पलटी झाल्याने परप्रांतीय चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात एकलहरारोड भागात झाला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रमोद राजपूत (४० मुळ रा. उत्तरप्रदेश हल्ली श्रीकृष्णनगर,अरिंगळे मळा) असे मृत चालकाचे नाव आहे. राजपूत मंगळवारी (दि.२८) एकलहरे येथून सिन्नर फाट्याच्या दिशेने आपल्या ओमनी कार मधून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.
भरधाव कार सिन्नर फाटा मार्केट परिसरात पलटी झाल्याने राजपूत गंभीर जखमी झाला होता. बबलू राजपूत यानी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. किरण सोनार यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार ठेपणे करीत आहेत.