नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– परिसरातील दहशत कायम राहवी यासाठी धारदार कोयते घेवून फिरणा-या दोघाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांच्या ताब्यातून लोखंडी कोयते हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली.
सुनिल रामनाथ राऊत (२०) व आदित्य एकनाथ भालेराव (१९ रा. दोघे राजवाडा देवळालीगाव)) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित शस्त्रधारीची नावे आहेत. नाशिकरोड रेल्वेस्टेशन परिसरातील मालधक्का गेट जवळ सोमवारी (दि.२७) सायंकाळी दोघे धारदार शस्त्राचा धाक दाखवित दहशत माजवित होते. याबाबत माहिती मिळताच युनिट २ च्या पथकाने धाव घेत दोघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
या कारवाईत लोखंडी कोयते हस्तगत करण्यात आले असून युनिटचे कर्मचारी विलास गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.