नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आडगाव शिवारातील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी सोमवारी (दि.२७) गळफास लावून घेत आत्महत्या केली. दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पोलीस दप्तरी वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
जत्रा हॉटेल परिसरातील ऋषिकेश आनंदराव मवाळ (२७ रा. स्वामी समर्थनगर) या युवकाने सोमवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मामा अमोल देवरे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले.
दुसरी घटना आडगाव गावातील होळी चौकात घडली. तानाजी पुंडलीक माळोदे (३८) यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लाकडी अडगईला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ऋषीकेश हांडे यांनी खबर दिली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी वेगवेगळ््या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.