नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टेलिग्रामच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी शहरातील एका महिलेस तीन लाख रुपयांना ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार हेमा शोमु इसराणी (रा. कुलकर्णी गार्डनरोड, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. हेमा इसराणी यांच्याशी सायबर भामट्यांनी गेल्या ८ ते १५ डिसेंबर दरम्यान टेलिग्रामवरून संपर्क साधला होता. अनिका रिसेप्ट ऑनिस्ट नाव धारण केलेल्या व्यक्तीने इसरानी यांची गोपनिय माहिती मिळवून हा गंडा घातला.
गोपनिय माहितीच्या आधारे इसरानी याच्या बँक खात्यातील २ लाख ९७ हजार रूपयांची रक्कम परस्पर अन्य खात्यात वर्ग करून ही आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. अधिक तपास निरीक्षक जानकर करीत आहेत.