नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पार्क केलेल्या मालट्रक मधून चोरट्यांनी इंधन चोरून नेल्याची घटना नवीन आडगावनाका भागात घडली. या घटनेत भामट्यांनी सुमारे १४ हजार रूपये किमतीच्या १६० लिटर डिझेलवर डल्ला मारला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय रामसुरत यादव (मुळ रा. उत्तरप्रदेश हल्ली ब्यास रोडलाईन गांधी पेट्रोल पंपामागे,नवीन आडगावनाका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. यादव यांचा एमएच ४३ वाय ४४४८ हा मालट्रक शनिवारी (दि.२५) रात्री घर परिसरात पार्क केलेला असतांना ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यानी ट्रकच्या डिझेल टाकी मधील सुमारे १६० लिटर इंधन चोरून नेले. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.