नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-शहर परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, वेगवेगळया ठिकाणाहून तीन वाहने चोरट्यांनी चोरून नेली. त्यात घराजवळ पार्क केलेल्या कारसह अॅटरिक्षा व दुचाकीचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष मुरलीधर शिंदे (रा.नवले मळा,दामोधरनगर पाथर्डीफाटा) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे यांची एमएच १५ जीएल ९४५२ ही इको कार बुधवारी (दि.२२) रात्री त्यांच्या घराजवळ पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. या कारमध्ये औद्योगीक वसाहतीतील उद्योग स्वामिनी या इमारतीतील शॉपचे कागदपत्र होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत. दुसरी घटना काझीगडी भागात घडली. यासिन कासम शेख (रा.जुम्मा मज्जीत जवळ) यांनी फिर्याद दिली आहे.
यासिन शेख यांच्या मालकिती अॅटोरिक्षा एमएच १५ ईएच ०५५६ बुधवारी (दि.२२) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार काकड करीत आहेत. तर पंचवटीतील संदिप प्रकाश जगताप (रा.नाटकर लेन,मालविया चौक) यांची मोटारसायकल एमएच ४१ ई ८५६५ गेल्या ३१ डिसेंबर रोजी रात्री परिसरातील महाराष्ट्र आर्यन भांड्याच्या दुकानाजवळ लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार नाईक करीत आहेत.