नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीस दलात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने भामट्याने एका बेरोजगारास पावणे तीन लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस भरतीत अपयश आल्याने युवकाने पैश्यांचा तगादा लावला असता संशयिताने सदर रकमेचा धनादेश दिला होता. मात्र बँकेत पैसे शिल्लक नसल्याने धनादेश परत आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आ
रामनाथ ठकाजी पवार (रा.लोकधारा सोसा.) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत समाधान भाऊसाहेब मते (२९ रा.शिवाजीनगर,चांदवड) या बेरोजगाराने फिर्याद दिली आहे. मते हा पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करीत होता. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही अयशस्वी झाल्याने त्याने पवार याची भेट घेतली असता ही फसवणुक झाली. संशयिताने ग्रामिण पोलीस दलात तुला भरती करून देतो अशी बतावणी करीत या पोटी ३१ डिसेंबर रोजी २ लाख ७५ हजाराची रोकड स्विकारली होती.
त्यानंतर मते याने भरतीची परिक्षा दिली मात्र तो अपयशी झाला. यानंतर मते याने पैश्यांचा तगादा लावला असता संशयिताने धनादेश दिला. मात्र बँकेत पैसे शिल्लक नसल्याने तो परत आला. त्यामुळे मते यांनी फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.