नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहातच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अस्मिता संजय पाटील (१८) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. अस्मिताने महाविद्यालयाच्या वस्तीगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरील रूममध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
नाशिकमध्ये दोन दिवसापूर्वी एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा या आत्महत्येची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहे.