नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाडेतत्वावर घेतलेल्या टेम्पोचा एकाने परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आला आहे. करारानुसार भाडे न मिळाल्याने मालकाने शोध घेतला असता हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ अर्जुन पवार (मुळ रा.संगमनेर हल्ली अक्षर कॉलनी चेतनानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठकबाजाचे नाव आहे. याबाबत गोकुळ गंगाधर शिंदे (रा.गुंजाळबाबानगर हिरावाडी) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत शिंदे यांचा मालकिच्या एमएच १५ जीसी ७२४६ या आयशर टेम्पोचा परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे. शिंदे व संशयित यांच्यात गेल्या १ जानेवारी रोजी भाडेतत्वाचा करारनामा झाला होता.
त्यानुसार टेम्पो संशयिताच्या स्वाधिन करण्यात आला होता. मुदत उलटूनही भाडे न मिळाल्याने शिंदे यांनी चौकशी केली असता संशयिताने विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.