नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आडगाव शिवारातील बळी मंदिर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात साठ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याबाबत पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.
देवेश जितेंद्र धनराडे (रा.सिताई हाईटस,बळी मंदिराजवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. धनराडे कुटुंबिय मंगळवारी (दि.२१) दुपारी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ९२ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.