नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. दीड वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर संशयिताने नोकरीच्या बहाण्याने पोबारा केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश अभिमान सोनवणे (२० रा.अंबासन ता.सटाणा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरूणाचे नाव आहे. याबाबत औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात राहणा-या पीडितेने फिर्याद दिली आहे. सन.२०२३ मध्ये दोघांची ओळख झाली होती.
या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने ही घटना घडली. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून पिडीतेवर वेळोवेळी बलात्कार केला. हा प्रकार दीड वर्ष सुरू होता. संशयिताने अचानक नोकरीचा बहाणा करून पोबारा केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक न्हाळदे करीत आहेत.