नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळागावातील साठेनगर भागात धाड टाकत पोलीसांनी कत्तलखाना उध्वस्त केला. या गोठ्यात गोवंश जनावरांची हत्या करण्यात येत होती. याकारवाईत पथकाने १८ गोवंश जनावरांची सुटका करीत सुमारे २०० किलो गोवंशांचे मांस जप्त करण्यात आले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तीन संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नासिर बबलू कुरेशी, सुद्दाम बबलू कुरेशी (रा.दोघे वडाळानाका) व अजीज कुरेशी (रा.भारतनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कसाईची नावे आहेत. याबाबत किरण शिवाजीराव पाटील (रा.दसक जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. वडाळा गावातील रंगरेज मळा भागात असलेल्या गुलाम कोकणी यांच्या गोठ्यात गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार मंगळवारी (दि.२१) पहाटे पथकाने छापा टाकला असता या ठिकाणी पिकअप वाहनात कोंबून आणलेल्या गोवंश जनावराची कत्तल केली जात होती. जनावरांची सुटका करीत पोलीसांनी घटनास्थळावरून दोन दुचाकींसह मांस असा सुमारे तीन लाख ८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला असून अधिक तपास हवालदार खरोटे करीत आहेत.