नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आईच्या दागिण्यांवर मुलीने डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. भावाच्या घरातील दागिणे काढून बहिणीने आपल्या मित्रासमवेत पोबारा केल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भावना रमेश लोखंडे (२२ रा.किरणनगर चेहडीशिव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बहिणीचे नाव आहे. याबाबत साहिल लोखंडे यांनी फिर्याद दिल आहे. लोखंडे यांच्या आईचे सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे दागिणे या घटनेत बहिणीने पळविले आहे.
सोमवारी (दि.२०) सकाळी हा प्रकार घडला असून बहिणीने भावाच्या घरातील लाकडी कपाटात ठेवलेल्या आईच्या दोन सोनपोती चोरून नेल्या. बहिणीने ओळखीच्या मुलासमवेत दुचाकीवर पोबारा केल्याचे फियार्दीत नमुद करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक अजित शिंदे करीत आहेत.