नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळय़ा भागातून दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गंगापूररोड भागातील ऋषीकेश शंकर इंगळे (रा.गोकुळवाडी,विद्या विकास सर्कल जवळ) हे गुरूवारी (दि.१६) दुपारी गोदाघाटावर गेले होते. दुतोंड्या मारूती समोर पार्क केलेली त्यांची अॅक्टीव्हा एमएच ४१ बीसी ४९३६ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोतील त्रिमुर्तीचौक भागात घडली. रमेश एकनाथ पवार (रा.शिवशक्तीनगर सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पवार यांची अॅक्टीव्हा एमएच १५ डीएन ४८१८ गेल्या बुधवारी (दि.१५) सायंकाळी श्रीराम ज्युस सेंटर समोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टिळेकर करीत आहेत.