नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जीवे मारण्याची धमकी देत एकाने शेजारी राहणा-या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेम (रा.बेढेरे ता.चाळीसगाव) असे संशयिताचे नाव आहे. उसतोड कामगार कुटूंबिय माडसांगवी ता.जि.नाशिक येथे भाडेतत्वावर राहतात. या ठिकाणी संशयित वास्तव्यास होता. उसतोड कामगार कुटुंबिय गेल्या ऑगष्ट महिन्यात कामावर गेले असता ही घटना घडली.
अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत संशयिताने तिचे तोंड दाबून बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने मुलीने याबाबत कुणाला काही सांगितले नाही. मात्र यानंतर संशयिताने सलग एक महिना अत्याचार केला. यातून मुलगी गर्भवती राहिल्याने कुटुंबियाने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक निकम करीत आहेत.