नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एकतर्फी प्रेमातून एकाने तरूणीस मारहाण करीत विनयभंग केल्याचा प्रकार बादशाही कॉर्नर भागात घडला. मैत्रीणीच्या भावाशी का बोलते या कारणातून हा प्रकार घडला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिरोज रशिद अन्सारी (२० रा.वडाळागाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीता बुधवारी (दि.१५) रात्री कामावरून घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. बादशाही कॉर्नर वरील मल्हार वडापाव सेंटर समोरून पिडीता जात असतांना संशयिताने तिला गाठले.
यावेळी त्याने युवतीचा मोबाईल हिसकावून घेत तू तुझ्या मैत्रीणीचा भाऊ राहूल याच्याशी का बोलते असा जाब विचारला. पिडीतेने आपल्या मोबाईलची मागणी करीत हिसकावण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिला शिवीगाळ करती मारहाण केली. या घटनेत संशयिताने तू पुन्हा राहूलशी बोलली तर जीव घेईल अशी धमकी देत विनयभंग केला असून अधिक तपास उपनिरीक्षक रणदिवे करीत आहेत.