नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील संजीवनगर भागात राहणा-या २१ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हाफिज रेहमान खान (रा.विराट संकुल,तुळजा भवानी मंदिराजवळ संजीवनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. हाफिज खान या युवकाने बुधवारी (दि.१५) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या पाईपास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ मेहफुज खाने याने त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार अहिरराव करीत आहेत.