नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेअर मार्केट मधील गुंतवणुक आणि टास्कच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी शहरातील दोघांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत भामट्यांनी तब्बल साडे चौदा लाखांना गडविले असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार व विनोद बेलदार यांच्याशी भामट्यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यात संपर्क साधला होता. व्हॉटसअप,टेलीग्राम आणि लिंकच्या माध्यमातून संपर्क साधत तक्रारदार याना शेअर मार्केट मधील गुंतवणुकीवर ५० टक्के नफा मिळवून देण्याचे तर बेलदार यांना हॉटेल व रेस्टॉरंट रिव्हीव करण्याचा टास्क देवून ही फसवणुक करण्यत आली. ७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या काळात तक्रारदाराने ८ लाख ७१ हजार २९९ रूपयांची गुंतवणुक केली तर बेलदार यांच्या कडून ५ लाख ७१ हजार ५२० रूपयांची रक्कम उकळण्यात आली. या घटनेत दोघांची १४ लाख ४२ हजार ८१९ रूपयांची फसवणुक झाली असून संबधीतांना तवेगवेगळया बँक खात्यात या रकमा भरण्यास भाग पाडण्यात आले आहे. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच दोघांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक शेख करीत आहेत.