नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हिरावाडीतील एसएफसी गार्डन भागात राहणा-या २५ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शुभम दत्तात्रेय शिंदे (रा.निरजकंठेश्वर बिल्डींग,गणपती मंदिरा शेजारी एसएफसी गार्डन बाजूला) असे मृत युवकाचे नाव आहे. शुभम शिंदे या युवकाने सोमवारी (दि.१३) आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये अॅगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. बेशुध्द अवस्थेत कुटुंबियांनी त्यास तात्काळ खासगी रूग्णालयातून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार संदिप बाविस्कर करीत आहेत.
टोळक्याने पंक्चर दुकानदारास लुटले….
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मारहाण करीत टोळक्याने पंक्चर दुकानदारास लुटल्याची घटना दिंडोरीरोड भागात घडली. या घटनेत मोबाईलसह सात हजाराची रोकड बळजबरीने हिसकावून घेत भामट्यांनी दुकानातील व्हिल गण घेवून पोबारा केला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदरन चेलापन पिके (५७ रा.श्रीनाथ कृपा लॉन्स जवळ शिंदे वस्ती कमानी जवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पिके यांचा वाहनांचे पक्चर काढण्याचा व्यवसाय असून राहते ठिकाणी त्यांची टपरी वजा दुकान आहे.
याच दुकानात पिके वास्तव्यास असून शुक्रवारी (दि.१०) रात्री साडे आठच्या सुमारास दुकान वाढवून ते जेवण करीत असतांना ही घटना घडली. तोंड बांधून आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने पिके यांच्या दुकानात शिरून त्यांच्याकडे पैश्यांची मागणी केली. यावेळी पिके यांनी चोर चोर म्हणून आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्याच्या खिशातील मोबाईल व सात हजाराची रोकड बळजबरीने काढून घेतली. एवढ्यावरच न थांबता भामट्यानी दुकानातील व्हिल गण मशीन उचलून नेले असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.