नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हॉर्न वाजविल्याच्या रागातून दुचाकीस्वारांनी कारचालकासह महिलेस मारहाण करीत सोनसाखळी लांबविल्याचा प्रकार पेठरोडवरील दत्तनगर भागात घडला. या घटनेत ६० हजार रूपये किमतीचे सोन्याचे लॉकेट भामट्यांनी पळविले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आ
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मनिश गोडसे व त्याचे दोन दुचाकीस्वार साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत दिनेश बबनदास पटेल (५१ रा.गांधीधाम जि.भुज गुजराथ) यानी फिर्याद दिली आहे. पटेल बुधवारी (दि.८) नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास ते सातपूर येथून मेव्हणी चारूलता पटेल यांना सोबत घेवून शालक दिपक पटेल याच्या घरी जात असतांना ही घटना घडली.
पेठरोडवरील दत्तनगर परिसरात धावत्या कार (जीजे १२ डीएम ६७०५) समोर अचानक दुचाकीस्वार आल्याने त्यांनी हॉर्न वाजला असता ही हाणामारी झाली. संशयित दुचाकीस्वारासह त्याच्या दोन साथीदारांनी चालक पटेल व त्यांच्या मेव्हणीस शिवीगाळ करीत मारहाण केली. या घटनेत भामट्यांनी पेल यांच्या गळय़ातील सुमारे ६० हजार रूपये किमतीची सोनसाखळी बळजबरीने हिसकावून पोबारा केला ्असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.