नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घर खरेदी विक्री व्यवहारात एकास तब्बल साडे तीस लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. पाच वर्ष उलटूनही संबधितांनी व्यवहार पूर्ण न केल्याने खरेदीदाराने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मायलेका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीरंग शिवाजी काकळीज व रोहिणी शिवाजी काकळीज (रा.श्रीरामचंद्रनगर,आयोध्यानगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत गणेश बबन हंगरगे (रा.शिवरामनगर दसक) यांनी फिर्याद दिली आहे. काकळीज यांच्या मालकिचे एकलहरे शिवारातील भुमापन क्र.४०३ या मिळकतीवर असलेल्या मोरया रो हाऊस मधील २२ क्रमांकाचे रो हाऊस आहे. या मिळकतीचा हंगरगे यांनी सन.२०२० मध्ये व्यवहार केला होता.
या व्यवहारात ३० लाख ३० हजार २१० रूपयांची रक्कम अदा करण्यात आली. मात्र संशयितांनी पाच वर्ष उलटूनही व्यवहार पूर्ण केला नाही. संबधीतांनी आर्थिक फसवणुक केल्याचे लक्षात येताच हंगरगे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.