नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडत टोळक्याने टेम्पोतील बिस्कीट आणि कोल्ड्रींगचा साठा चोरून नेला. ही घटना रविवार कारंजा भागात घडली . याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी एका संशयितास बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार यश वाणी (२१) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याचे तीन साथीदार पसार झाले आहेत.
याबाबत प्रशांत सुधीर जालोरी (४२ रा. रविवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. जालोरी यांचा विक्रेत्यांना बिस्कीट आणि कोल्डींग पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. सोमवारी (दि.६) नेहमी प्रमाणे शहरातील व्यापाºयांना मालाचा पुरवठा करून त्यांनी आपला मालवाहतूकीचा टेम्पो रविवार कारंजा भागात पार्क केला असता ही घटना घडली. संतप्त टोळक्याने परिसरातील ओमनीकार एमएच १५ जीएक्स ०३३६ सह टेम्पोची काच फोडून ही चोरी केली.
भामट्यांनी टेम्पोतील बिस्कीटांचे चार बॉक्स,व वेगवेगळया कंपनीचे आठ कॅरेट कोर्ल्डींग असा सुमारे ५ हजार ८८५ रूपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेची दखल घेत पोलीसांनी परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून अधिक तपास हवालदार थेटे करीत आहेत.