नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– दुचाकीची वाट अडवित एकाने युवतीचा विनयभंग केल्याची घटना तपोवनरोडवर घडली. एकतर्फी प्रेमातून पाठलाग करीत संशयिताने हे कृत्य केले असून तू माझी झाली नाही तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबीन खान (रा.सिन्नर जि.नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार गेल्या ५ डिसेंबर पासून संशयिताने तिचा सिन्नर ते नाशिक असा पाठलाग केला. मगळवारी (दि.७) सकाळी पीडिता दुचाकीवर तपोनरोडने काठेगल्लीच्या दिशेने प्रवास करीत असतांना मोटारसायकल आडवी लावून संशयिताने तिची वाट अडविली.
फोन आणि मॅसेज करतोय तू रिप्लाय का देत नाही असा जाब विचारत युवतीस शिवीगाळ करीत दमदाटी केली. तसेच तू माझी झाली नाही तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत संशयिताने अंगलट करीत तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक तोंडे करीत आहेत.