नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उघड्या दुकानातून भामट्यांनी व्यावसायीक महिलेची पर्स चोरून नेली. या पर्समध्ये ७० हजाराची रोकड होती. ही घटना रामसेतू पुल परिसरात घडी असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूबिना अय्युब मनियार (रा.द्वारका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रूबिना मनियार यांचा बांगडी विक्रीचा व्यवसाय आहे. रामसेतू पुल परिसरातील बालाजी कोट मंदिरासमोर त्यांचे दुकान वजा टपरी आहे. मनियार यांचे पती शनिवारी (दि.४) अल्पावधीसाठी दुकानाबाहेर गेले असता ही चोरी झाली.
अज्ञात चोरट्यांनी उघड्या दुकानात शिरून रूबिना यांची पर्स चोरून नेली. या पर्समध्ये सुमारे ७० हजाराची रोकड होती. अधिक तपास जमादार शेवाळे करीत आहेत.